भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन; २८३ गुन्हेगारांची तपासणी

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी, कोणतेही घातपाती कृत्य / अपघात घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १९.०० ते २२.०० वा. दरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या राबविण्यात आले.

या ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यातील ४९ अधिकारी व ३०७ अंमलदार हजर होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दारूबंदी कायद्यान्वये २६ कारवाया, मोटर वाहन कायद्यान्वये १५९ केसेस आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या २० कारवाया करण्यात आल्या. कारागृहातून सुटलेले गुन्हेगार, अभिलेखावरील गुन्हेगार, माहितीगार गुन्हेगार अशा एकूण २८३ इसमांना चेक करण्यात आले. तसेच नाकाबंदी दरम्यान ७१३ वाहने चेक करण्यात आली.

कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जातो. स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला जातो. शांतता व कायदा-सुव्यवस्था राखली जाते आणि दहशतवादी, नक्षलवादी कारवाया रोखल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *