दुर्गाोत्सवाचा थाट, जिल्हा भक्तीच्या रंगात न्हाला

गरबा, आकर्षक रोषणाई अन् मंडपाच्या सजावटीने बाजारपेठांमध्ये चैतन्य

भंडारा: शारदीय नवराोत्सवाच्या पावन पर्वाला आजपासून उत्साहात प्रारंभ होत असून, संपूर्ण भंडारा जिल्हा आदिशक्ती मां जगदंबेच्या भक्तीत आणि गर्ब्याच्या तालावर थिरकण्यासाठी सज्ज झाला आहे. भक्तीचा जागर, रोषणाईने उज्ज्वलणारे चौक आणि नऊ रात्रीचा नयनरम्य उत्सव यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत असून, तज्जबद्दल ५६ मंदिरांमध्ये ११,११८ घटस्थापना केली जाणार आहे. तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने ४४८ ठिकाणी दुर्गेची आणि २७४ ठिकाणी शारदा देवीची अशा एकूण ७२२ ठिकाणी भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी ओसंडली होती. घट, तांब्याची पात्रे, पूजेचे साहित्य, कमळाची फुले, फळे, मिठाई आणि उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. देवीच्या शृंगाराची चुनरी आणि कुंकू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळाली.

सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी: केवळ मंदिरातच नव्हे तर गल्लीबोळातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही शेवटच्या टप्प्यातील धावपळ वाढली आहे. आकर्षक मंडप सजावट, विद्युत रोषणाई, भव्य देखाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. गांधी चौक, राजीव गांधी चौक, खांब तलाव परिसर, शुक्रवार पेठ आणि खात रोड परिसरात भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

प्रमुख मंदिरांत भाविकांचा ओघ वाढणार: उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील प्रमुख देवीच्या स्थानांवर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. कोरंभी येथील पिंगलाई देवी मंदिर, आदिशक्ती माता देवस्थान, मोहागाव येथील मोहागावी देवी, मोहाडी येथील चौडेश्वरी देवस्थान, चाम्राड येथील दुर्गा माता मंदिर, रावणवाडी येथील पहाडी अंबामाता मंदिर, भंडारा शहरातील खांब तलावाच्या काठावरील शीतला माता मंदिर, स्टेट बँकेजवळील अंबाईर्निंबई माता मंदिर, आणि मोठा बाजार परिसरातील अन्नपूर्णा माता मंदिर, पवनीच्या भंगाराम माता मंदिर आणि कालिका माता मंदिरात विशेष भक्तीपूर्ण आराधना केली जाणार आहे.

नऊ दिवस, नऊ रूप आणि भक्तीचा अनोखा संदेश: शारदीय नवरात्रात देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौर आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा-आराधना केली जाते. या प्रत्येक रूपातून शक्ती, धैर्य, संयम, करुणा आणि विजयाचा संदेश मिळतो. पुढील नऊ दिवस जिल्ह्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *