नेपाळमध्ये महापूरात भंडारा जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्यास प्रशासनाशी संपर्क साधा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- नेपाळमध्ये महापूरस्थिती निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणात पर्यटक व नागरिक अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतातील काही पर्यटकही अडकले असण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून महापूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा आपल्या ओळखीतील, नातेवाईक अथवा अन्य व्यक्ती नेपाळमध्ये अडकल्या असल्याची माहिती असल्यास, त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा मो. ९७६७९६८१६६ (फक्त भंडारा जिल्ह्याकरिता) खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल.

नेपाळमध्ये अडकलेल्या व्यक्तीची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण, प्रवासाचा तपशील तसेच कुटुبيयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास देण्यात यावा.

भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या नातेवाईक, परिचित अथवा व्यक्तीबाबतची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनास द्यावी. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्र्फत करण्यात येत आहेत.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार अद्याप भंडारा जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिकांची संख्या ही निरंक असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *