लाखांदूर तालुक्यात अवैध रेती चोरीविरुद्ध सर्वात मोठी कारवाई

३ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना अटक

भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा जिल्हा पोलिसांनी लाखांदूर तालुक्यात अवैध रेतीचोरीविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३ आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांचे अधीक्षक नुरुल हसन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची खानिशा करण्यासाठी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा तथा सहा. पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक लाखांदूर येथील चिचोली रोड, आथली घाट, चुलबंध नदी या ठिकाणी रवाना करण्यात आले. सहा. पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांनी पथकासह रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी छापा टाकून अवैरित्या उत्खनन करून रेती चोरी करणारी टोळी व वाहनांना घेराव घालून ताब्यात घेतले.

सदर ठिकाणी अवैध रेती चोरी करणारे राहुल सुरेश परशुरामकर (वय २७ वर्ष, रा. पिपळगाव/को. ता. लाखांदूर), मुकेश रेशीम गाबकवाड (वय ३४ वर्ष रा. खेडगाव ता. कुरखेडा जि. गडचिरोली) व हेमंत अंतराम बोरकर (वय ३१ वर्ष रा. लाखांदूर) असे ३ आरोपी जागीच ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून पळून गेले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर रेड कारवाईमधील सहभागी आरोपी वाहन मालक तसेच चालक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन लाखांदूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहा. पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनात सपोनि आशिष बोरकर, पोलीस उपनिरीक्षक मनोहर गाडवे, सहा. फौजदार गिरीश बोरकर, हवालदार राजेश टेंभूर्णे, प्रशांत कुरंजेकर, ईश्वरदत मडावी, हवालदार सतीश गिन्हेपुंजे, टिकराम कोरे, सुभाष राहांगडाले, नायक वैभव धामट, सिपाई रोहित अंबादे, तिरुपति घुगे, स्वप्नील शिवनकर, चालक सहा. फौजदार ओमप्रकाश उदापुरे यांनी केली आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

१) २ ट्रक टिप्पर (एकूण किंमत ८० लाख रुपये)

२) २ जेसीबी मशीन (एकूण किंमत ७० लाख रुपये)

३) २ ट्रॅक्टर लोडर (एकूण किंमत ३० लाख रुपये)

४) २१ ट्रॅक्टर (एकूण किंमत १ कोटी ६८ लाख रुपये)

५) एकूण २३ ब्रास रेती (एकूण किंमत १ लाख ३८ हजार)

असा एकूण ३,४१,३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक पोलीस व महसूल विभागाचे अपयश उघड

पोलीस अधीक्षकांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर थेट सहा. पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या पथкаला छापा टाкаवा लागला. इतक्या मोठ्या प्रमाणात रोजी रेती चोरी सुरू असताना संबंधित क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, लाखांदूर व महसूल विभाग काय करीत होते? या तस्करांना अभय कुणाचे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या अपयशाची वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *