पालकमंत्र्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
घेऊन शिवसैनिक धडकले पोलीस स्टेशनवर
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धोप येथील राजेंद्र सपाटे নামক शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी केलेली आत्महत्या ही पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमधून आलेल्या नैराश्याच्या भावनेतून केली. पालकमंत्र्यांनी जर त्यादिवशी राजेंद्र सपाटे यांच्या रस्ता संदर्भात, नालीच्या नेहराच्या अडचणी समजून घेऊन त्वरित अधिकाऱ्यांना जर निर्देश दिले असते तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याचे समाधान होऊन त्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबिला नस्ता, वारंवार विनवण्या करून सुद्धा आणि माझ्या अडचणी दूर झाल्यात नाही, तर मला आत्महत्या शिवाय दुसरा मार्ग उरणार नाही एवढे बोलूनही पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याच्या विनवणीला आणि शब्दाला गांभीर्याने घेतले नाही आणि चार दिवसानंतर राजेंद्र सपाटे या शेतकऱ्याने दुर्दैवाने आत्महत्या केली. आणि म्हणून त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येस पालकमंत्र्यांचे बेजबाबदारपणे वागणे हेच कारणीभूत असल्यामुळे त्या संदर्भाने आज आंधळगाव पोलीस स्टेशनला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे व इतर पदाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, संबंधित आंधळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांनी तक्रार नोंदवण्यास असमर्थता व्यक्त केली.
बराच वेळ त्यांच्याशी चर्चा करूनही पोलीस निरीक्षक हे गुन्हा नोंदवण्यास तयार नव्हते. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या गेटवरच घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘राजेंद्र सपाटे यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पालकमंत्र्यांवर गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे.’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला, आणि त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी च्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वना पर भेट घेतली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पारधी, मोहाडी तालुकाप्रमुख प्रवीण गायधने, तुमसर तालुकाप्रमुख ईश्वर भोयर, शहर प्रमुख राकेश आघ्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, उपशहर प्रमुख राजेश ठकफर, उप तालुका प्रमुख गोवर्धन मारवाडे, सत्यनारायण कामथे, शिवराज सुरणकर, निखिल बशिनी, राजेश कांबळे, विलास भुरे, यश पारधी, विधजीत पांडे, एकांत मोहरे, संकेत कोसरे, डेव्हिड पटले, पितांबर खंडाते, कैलास नागदेवे, दिपक पटले, दिपक डोंगरे, अरुण फर्टिंग, राजेश शेंडे, श्रीकांत सार्वे, दिपक भोयर इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








