वाहकाच्या सतर्कतेने प्रवाशाचे वाचले प्रा़ण

प्रवासी प्रिया रामटेके हीची कामगिरी देखील वाखाणण्यासारखी

दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- साकोली वरून नागपूरला जाणाऱ्या साकोली आगार्याच्या एसटी बस क्र. एम एच १४ एल एक्स ८३७३ मधील प्रवासी लखन जुगनाके रा. देवरी याला प्रवास करीत असता अचानक बसमध्येच लाखनी येथील समर्थ नगर प्रवासी निवारा समोर हृदय विकाराचा झटका आला. व तो तडफडू लागला. हे सर्व प्रवाशांच्या लक्षात आले त्यांची तडफड पाहून बाजूलाच बसलेली तरुणी प्रिया रामटेके साकोली हिने न घाबरता क्षणाचाही विलंब न करता लखन जुगनाके यांना सीपीआर देणे सुरू केले. अशा वेळी रुग्णाला ज्या पद्धतीने डॉक्टर असलेले लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात तडकाफडकी बस वळवली. अन्य प्रवाशानी देखील मोठी मदत करून स्ट्रेचर आणून तात्काळ रुग्णाला स्ट्रेचर वर घेऊन दवाखान्यात भरती केले व क्षणाचा ही विलंब न करता रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. हळूहळू परिस्थिती सुधारली रुग्ण आता धोक्याच्या बाहेर आहे. अगदी त्या पद्धतीने ट्री़ट करणे सुरू केले. अन्य प्रवाशानी ही बाब चालक राहुल ईलमकार आणि वाहक अनिल वलथरे यांच्या लक्षात आणून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *