सिहोरा येथे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव साजरा
पोलिसांचा चोख बंदोबस्त
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- आज २६ ऑगस्ट रोजी सिहोरा येथे मोहम्मद पैगंबर यांचा १५०१ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिहोरा व परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र येऊन एकतेचा परिचय दिला. यात लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. ठिकठिकाणी व चौका चौकात मिठाई, सरबत व बिस्किट वाटप करण्यात आले.
सकाळी ९ वाजता इंतेजामिया कमिटी मस्जिद मदरसा सिहोरा येथे एकत्र येऊन ढोल, ताशा, संदल व लाऊड स्पीकरच्या गजरात रॅली काढण्यात आली होती. मस्जिद मदरसा बाजार चौक, गोबरवाही फाटा, बस स्थानक ते बँक ऑफ इंडिया मार्गे गुजरी चौकातून मस्जिद मदरसा येथे येऊन रॅलीचे समापन करण्यात आले.
(छायाचित्राखालील ओळ: मस्जिद मदरसा समोर एकत्र आलेले मुस्लिम बांधव)
मस्जिद मदरसा लाल चौकात समापन करण्यात आले त्यावेळी उपस्थितांना मोहम्मद पैगंबर जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा देत सोहळा शांततेत पार पाडल्या बाबद तसेच हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन एकतेच परिचय दिल्याबद्दल व हिंदू मुस्लिम एकता, शांतता आणी बंधु भाव कायम राहावा असे आवाहनही करण्यात आले.
मोहम्मद पैगंबर जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मस्जिद मदरसा इंतेजामिया कमिटीचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेतले. तर पोलीस स्टेशन सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन हे आपल्या पोलीस ताफ्यासह पाळत ठेवून होते हे इथे उल्लेखनीय आहे.








