लोकंशी संपर्क वाढवलं तरच पक्ष वाढेल
शिवसेना जिल्हा आढावा बैठकीत आं. भोंडेकर यांचे आवाहन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: पक्ष मजबूत करायचे असेल तर गरिबांचे कामे करा, त्यांना शासनाच्या योजना मिळवून द्या, तरच त्यांच्याशी तुमची नाळ जुडेल्. लोकांमध्ये संपर्क वाढला की पक्षाला बळ मिळेल. फक्त पद मिळाल्याने पक्ष मजबूत होत नाही असे विचार आ. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले.
ते भंडारा जिल्हा शिवसेना संगॉतच्या आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून बोलत होते. या बैठकीत जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर सह अन्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे या वेळी छावा चालक मालक संघटनेचे आणि सावरी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रहर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, ज्यांचे आमदार भोंडेकर यांनी भगवा दुपट्र्याने स्वागत केला.
बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनने करण्यात आली. ज्या नंतर जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी जिल्ह्यातील संघटनेचा आढावा दिला. याच प्रमणे जिल्ह्यातील सातही तालुक्यातून आलेल्या तालुका प्रमुखांनी आपल्या क्षेत्रातील आढावा प्रस्तुत करून त्यांना येणाऱ्या समस्या ठेवल्या. ज्या वर तोडगा काढण्याकरिता आता तालुका स्तररावर प्रत्येक महिन्याला एक बैठक घेण्याचे आश्वासन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषाणात आमदार भोंडेकर पुढे म्हणाले की, पुढील गेल्या विधान सभा व लीकसभाच्या निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामे केली असली तरीही आज पक्ष जिल्ह्यात आव तसा मजबूत नाही आहे. या करिता पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील गोर गरिबांची कामे करून देणे तसेच शासनाच्या योजना गरजूंना मिळवून देण्याची आवश्यकता आहे. ज्या मुळे नागरिकांची नाळ पक्षाशी जुळून येईल आणि पक्ष बांधणीला आधार मिळेल. या करिता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की भंडारा नगर परिषदेचा ३२ कोटीचा असलेला बजेट हा गेल्या काळात १०० कोटी पर्यंत गेला. ज्या मुळे विकास कामे हि शक्य झाली. पुढे जिलापारीशदेची निवडणुका आहेत, त्यात आपले अधिकाधिक उमेदवार कसे निवडणून येतील या करिता पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्राचा सर्व्हे करून कामे करणे गरजेचे झाले आहे. तरच जिह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद आणि गरम पंचायतीवर निवडणुका लढणे शक्य होईल. एवढेच नाही तर शिवसैनिक म्हणून आपल्या क्षेत्रात ओळख निर्माण झाली पाहिजे. कुणी जर विकासाकामाच्या विरोधात गेला तर त्याला शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देणे गरजेचे आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्यालं तरच आपला पक्ष जिल्ह्यात क्रमांक एक वर यायला वेळ लागणार नाही.
या बैठकीचे संचालन उपिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे यांनी केले. या वेळी मंचावर उपिल्हा प्रमुख विकास मदनकर, उपिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उपिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, उपिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, महिला आघाड़ी जिल्हा प्रमुख साविताताई तुरकर, युवा सेना प्रमुख अंकुश वंजारी, नितीन સેલોकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गजभिये, न. प. गटनेता राजू धुर्वे, जिल्हा संघटक नितीन नकाते, भंडारा तालुका प्रमुख संजय आकरे, दत्तू जगनाडे, पवनी तालुका प्रमुख जितेश इखार व रोशन काटेखाये, माजी नगराध्यक्ष बाबू बागडे, मुकेश थोटे, नगर सेवक विनयमोहन पाशिने, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, भंडारा महिला तालुका प्रमुख विद्या मेहर सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.








