वैचारिक दर्जा, सुसंस्कृतपणा व संयम यातून यश प्राप्त होते- आ. अविनाश ब्राह्मणकर

दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जासवंत कापगते ८१ वर्षांचे असून नवयुवक आहेत ही सर्वांसाठी प्रेरणा आहे. प्रीतीचा आयुष्यातील खूप मोठा संघर्ष आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून तिने खूप मोठी यशाची उंची गाठली आहे या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. राजकारणात अनेकदा कटुता निर्माण होते पण ती कटुता तिथेच विसरून पुढे जाणे गरजेचे असते. कितीही मोठ्या पदावर पाहोचलो तरी वैचारिक दर्जा, सुसंस्कृतपणा व संयम कायम ठेवून वागणे गरजेचे असते तरच यशाचे पुढचे टप्पे गाठता येतात असे प्रतिपादन आ. अविनाश ब्राह्मणकर यांनी जांभळी येथे केले.

नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जासवंत पाटील कापगते यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व नुकतीच गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आचार्य पदवीने सन्मानित संस्थेच्या संचालिका प्रीती कापगते हातझाडे तसेच नवनियुक्त आ. अविनाश ब्राह्मणकर यांचा गौरव सोहळा दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी जांभळी सडक येथील मार्तंड राव पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात थाटात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी सत्कारमूर्ती जासवंत पा. कापगते, डॉ. प्रीती कापगते (हातझाडे), आ. अविनाश ब्राह्मणकर तसेच अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, अतिथी म्हणून मातोश्री यशोदा कापगते, जि. प. सदस्य वनिता डोये, जि. प. सदस्य जयश्री देशमुख, माजी जि. प. सदस्य डॉ. विनोद नाकाडे, माहेश्वरी नेवारे, डॉ. प्रभाकरराव गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रेम गहाणे, सभापती डॉ. उमाकांत काशिवार, जीवन शिक्षण संस्था लाखनीचे अध्यक्ष धनंजय तिरपुडे, श्याम शिक्षण संस्था खोडशिवनीचे अध्यक्ष शामराव मस्के, नवयुवक शिक्षण संस्थेचे सचिव तथा आयोजक होमराज कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रीती कापगते व जासवंत पा. कापगते यांच्या तर्फे नातू डॉ. दीपक कापगते यांनी सत्कारला उत्तर देताना जीवनात संघर्ष महत्वाचा आहे. त्यातूनच जीवनाचे यशाचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन केले. अध्यक्ष डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी सत्कार मूर्तीना शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्वांना कुटुंबातील कोणाचाही मृत्यू झाल्यास मरणोत्तर नेत्रदानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक प्राचार्य होमराज कापगते यांनी तर सूत्रसंचालन एल. बी. पारधीकर व शारदा कोलटेके यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक सुशील कापगते यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य अर्चना सर्वे, प्राचार्य रामकृष्णे लंजे तसेच मार्तंडराव कापगते विद्यालय जांभळी व रामाजी कापगते विद्यालय बोदरा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *