आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भंडारा पोलिसांचा रूट मार्च
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणारात पार पडण्यासाठी भंडारा पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची तयारी आणि सज्जा दाखवणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता.
पोलिस स्टेशन, भंडारा येथून या रूट मार्चला सुरुवात झाली असून हा मार्च जलाराम चौक, मेंढा रोड, चांदनी चौक, सामान्य रुग्णालय रोड, पोस्ट ऑफिस चौक, संविधान चौक, तुकडोजी पुतळा आणि गांधी चौकातून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये परत येऊन समाप्त झाला.
या रूट मार्चमध्ये पोलीस अधीक्षक नूरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, अतिरिक्त चार्ज, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा ज्योतीका इंगळे मॅडम आणि पो. नि. भुसारी, पो. नि. गायकवाड, पो. नि. तिवारी, पो. नि. बेलखेडे, सपोनि पाटील, सपोनि जगताप, सपोनि बैरागी यांच्यासह आर.सी.पी. पथक व मोहाडी, वरठी, करडी आणि कारधा पोलीस स्टेशनमधील अमंलदार असे एकूण १२ पोलीस अधिकारी, १४० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी सर्व जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.








