बरवाही पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर धाड
💥 सात जणांवर गुन्हा दाखल
💥 ३ लाख २१ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा
गोबरवाही :- पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जुगारियांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम व वाहने असा एकूण ३ लाख २१ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मौजा सुंदरटोला येथे करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोहवा राठोडें, पो.स्टे. गोबरवाही यांनी धाड टाकली असता आरोपी भाऊराव छोटू मेश्राम (वय ४५), लोकेश गौरीशंकर चौधरी (वय ३४), राजेश रामा सिंद्राम (वय ३९), पुरुषोत्तम फुलचंद परतेकी (वय ४५), सर्व रा. सुंदरटोला, ता. तुमसर, श्यामराव मोतीराम मरकाम (वय ५०), रा. येदरबुची, ता. तुमसर हे जुगार खेळताना मिळून आले. तसेच पसार आरोपी संदीप शिवराम नोनारे (वय २८) रा. येदरबुची व विकास शिवचरण कुंभरे (वय २५), रा. सुंदरटोला हे फरार आहेत.
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडटीतून व फळावरील नगदी, सहा दुचाकी असा एकूण ३ लाख २१ हजार ९७० रुपयांचा जुगाराचा माल मिळून आल्याने पोलीस स्टेशन गोबरवाही येथे अपराध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा राठोडें, पोहवा पेंडाम, पोलीस स्टेशन गोबरवाही यांनी केली असून पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.








