देशभक्तीच्या गीतांनी दुमदुमला भंडारा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- सार्वजनिक वाचनालयातील इंद्रज सभागृहात देशभक्तीच्या सुरांनी आणि समूह নৃত्याच्या ठेक्यांनी भंडारा शहर दुमदुमून गेले. भंडारा युवक बिरादरी, असर फाउंडेशन, सार्वजनिक वाचनालय व नगर परिषद, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनानिमित्त आयोजित ‘क्रांतीस्वर’ जिल्हास्तरीय समूहगीत व समूहृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कारړهक्रमाचे उद्घाटन जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सोनेटके यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ही स्पर्धा राष्ट्रीय नेतृत्व, देशाभिमान आणि राष्ट्रीय मूल्ये जोपासणारी आहे. आपण पारतंत्र्यात জন্মलो नसलो तरी पूर्वजांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, याची खात्री आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांनी क्रांती दिनाची सदैव आठवण ठेवावी.’ अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा मधुरा मदनकर, युवक बिरादरीच्या संचालिका वर्षा दाढी, सुनिता जांगळे, सुरेश मोहिते उपस्थित होते. आ. डॉ. परिणय फुके, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पद्मश्री क्रांती शाह, स्वर क्रांती शाह यांनी शुभेच्छा संदेश पाठवले.
भारत माता व भंडारा युवक बिरादरीचे संस्थापक स्व. मनोज दाढी यांच्या प्रतिमेला माल्यर्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आर्थिक सहकार्य करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह व रोपेटे देऊन करण्यात आला. प्रास्ताविकात वर्षा दाढी म्ह बिरादरी (भारत ला ९ ऑगस्ट वर्ष पूर्ण होत अ गांधी यांची क्रांती दिनाचे आणि स्वातंत्र्य त्रिवेणी घेतली जात अ
पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी वंचितांच्या विकासासाठी कार्य केले. त्यांना मानाचा मुजरा. आ. डॉ. परिणय फुके यांनी हुतात्म्यांच्या स्मरणatून नव्या पिढीला सामाजिक कार्याची ऊर्जा मिळेल, असे सांगितले.
जिल्ह्यातील २० शाळा, विद्यालय व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीगीत, शौर्यगीत, समरगीत, देशभक्तीपर मराठी-हिंदी गीते सादर केली.
विजेते समूह गीतगायन – प्रथम : ओएसिस इंटरनॅशनल स्कूल, भंडारा, द्वितीय : सेंट मेरी स्कूल, तृतीय : नानाजी जोशी विद्यालय, शहापूर.
समूह नृत्य – प्रथम : स्कूल ऑफ स्कॉलर्स, खोकरला, द्वितीय : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल, बेरोडी, तृतीय : महिला समाज उच्च प्राथमिक शाळा, भंडारा. विजेत्यांना फिरता चषक तर सर्व सहभागी शाळांना स्मृतिचिन्ह, १ हजार रुपये रोख, मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
धो-धो पावसातही राहुल हुमणे, सरिता लोंदासे, अमर वैद्य यांच्यासह अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेऊन सहभाग नोंदवला, हे विशेष ठरले. सूत्रसंचालन सागर ठाकरे यांनी केले, आभार राधेश्याम बांगडकर यांनी मानले. यशस्वितेसाठी सुरेंद्र कुलरकर, वैभव कोलते, विक्रम फडके यांच्यासह युवक बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








