भंडारात खाटू श्यामजीच्या दिव्य स्वरूपाची प्राण-प्रतिष्ठा

पाच दिवसीय अनुष्ठानाचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- शहरातील श्रद्धाळू भक्तांच्या असीम आस्थेतून खात रोड स्थित शक्ती नगर येथे दि. २० नोव्हेंबर २०२६, शुक्रवार रोजी खाटू श्याम बाबाच्या दिव्य स्वरूपाची प्राण-प्रतिष्ठा भक्तांद्वारे पूर्ण श्रद्धेने करण्यात येणार आहे.

यासाठी दि. १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाच दिवसीय अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुष्ठानाचे मुख्य यजमान श्याम भक्त तिलक अरविंद हटवार राहणार असून त्यांच्या उपस्थितीत सर्व विधी पार पडणार आहेत.

क्रमानुसार, दि. १६ नोव्हेंबर सोमवार रोजी जल अनुष्ठान, १७ नोव्हेंबर मंगलवार रोजी दुग्ध अनुष्ठान, १८ नोव्हेंबर बुधवार रोजी धान्य अनुष्ठान, तर १९ नोव्हेंबर गुरुवार रोजी पुष्य आणि शैया अनुष्ठान होणार आहे. याच दिवशी सकाळी ८ वाजता प्राण-प्रतिष्ठेच्या निमित्ताने शहरात निशान व कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा मोठा हनुमान मंदिर, मोठा बाजार येथून सुरू होऊन राम मंदिर मेन रोड, गांधी चौक, जैन डेअरी, संकटमोचन हनुमान मंदिर, संताजी मंगल कार्यालय, शितला माता मंदिर, बहिरेश्वर मंदिर चौक, खात रोड शक्ती नगर गेट मार्गे थेट श्याम धाम, शक्ती नगर येथे पोहोचेल. सकाळी ११ वाजता यात्रेचा समापन होणार असून सर्व श्याम भक्तांनी मोठ्या संख्यене उपस्थित राहण्याचे आवाहन श्याम मित्र मंडळाने केले आहे.

दि. २० नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळपासून शीश के दानी खाटू श्यामजीच्या दिव्य स्वरूपाची प्राण-प्रतिष्ठा होऊन सकाळी ११ वाजता महाआरती होईल. सायंकाळी ७ वाजता श्याम मित्र मंडळ, भंडारा तर्फे श्याम भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक पूजन वैदिक मंत्रोच्चाराने सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होईल. दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्रीराम मित्र मंडळ, भंडारा तर्फे भव्य संगीतमय सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भंडारा शहरातील धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनें उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन श्याम मित्र मंडळाचे सुधीर मोहबे व विनय सोलंकी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *