‘एक दिवा महाराजांच्या चरणी’ शिवदीपोत्सव उत्साहात साजा!
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, भंडारा व राधा रमण भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हनुमान मंदिर परिसर, शुक्रवार पेठ, भंडारा येथे पारंपरिक ‘एक दिवा महाराजांच्या चरणी’ शिवदीपोत्सव मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता हनुमान मंदिरात सामूहिक महाआरतीने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चिमुकली समृद्धी कुंभलकर हिने जोशपूर्ण शिवगर्जना (गारद) सादर करून उपстаितांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सामूहिक राष्ट्रवंदना करण्यात आली.
सायंकाळी ७ वाजता ‘एक दिवा महाराजांच्या चरणी’ या संकल्पनेतून स्मारक परिसरत दीपप्रज्जवलन करण्यात आले. असंख्य दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उज्जळून निघाला. स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे फटाक्यांची आतिषबाजी करून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. या सोहळ्यात राधा रमण भजन मंडळाचे सदस्य, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी महिला, पुरुष व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग, स्वराज्यनिष्ठा आणि प्रेरणादायी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, तसेच आपला इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमानाची जाणीव पुढील पिढीमध्ये रुजावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्ते, शिवभक्त, स्थानिक नागरिक व मंडळाच्या सदस्यांनी एकत्रितपणे दिवाळी फराळाचा आनंद घेतला.
या शिवदीपोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमासाठी रूपेश बावनकुळे, किरण साठवणे, दुर्गेश गभने, मयूर गभने, विक्की गोमासे, राजेश गभने, निहाल साकुरे, कार्तिक ठोसररे, निखिल कुंभळकर, प्रशांत पुरुषार्थी, नीलेश भोंगडे, आशिष भोंगडे, हिमांशू फुकेटे, तुषार साठवणे, समर्थ कुंभळकर तसेच हनुमान मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम फुकेटे यांनी परिश्रम घेतले. महिला वर्गातून भाग्यश्री कळंबे, मंगला भोंगडे, ज्योती बांगडकर, मंगला देशमुख, कल्पना फुकेटे, मीना जांगळे, फुतज्ञा कुंभलकर, मीनल ठोसररे, प्रीती साकुरे व सानिया जांगळे यांच्यासह अन्य शिवभक्त महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.








