जिल्हास्तरीय योगासन चॅम्पियनशिप व निवड चाचणी स्पर्धा थाटात संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत भंडारा डिस्ट्रिक योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन भारत चॅम्पियनशिप व निवड चाचणी स्पर्धा ९ ऑगस्ट २०२६ रोजी जेसीस कॉन्व्हेंट, भंडारा येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सब-ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर, सीनियर-ए, सीनियर-बी आणि सीनियर-सी अशा सहा वयोगटातील तब्बल १२६ योगासन स्पर्धाकांनी सहभाग नोंदविला. विविध चार योगासन प्रकारांमध्ये स्पर्धाकांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन रविंद्र सोनेटके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद भंडारा यांच्या हस्ते, कविता भोंगडे, प्राचार्य, जेसीस कॉन्व्हेंट यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी डॉ. अरुणकुमार लोहार, डीवायएसपी, सीआयडी, मा. मदन मेश्राम, अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक पतसंस्था, मोहाडी, डॉ. रमेश खोब्रागडे, अध्यक्ष, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन भंडारा तसेच धनंजय बिरनवार, सचिव, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन भंडारा यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय योगपटू सौरभकुमार व कामाक्षी मदनकर यांनी आर्टिस्टिक योगासनांची उत्कृष्ट प्रस्तुती करून उपस्थांची मने जिंकली. तसेच जेसीस कॉन्व्हेंटच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आकर्षक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक सादर केले.
स्पर्धेचे परीक्षण व जंजिंगची जबाबदारी प्रमाणित जज जयश्री फटे, शोभा लोहार, सलोनी ताडिकर, स्नेहल तिटके, आंतरराष्ट्रीय योगपटू सौरभकुमार, निशांत नेवारे, मनोज पुडके, यशवंत बीरे व श्री. देव्हारे यांनी समर्थपणे पार पाडली. तसेच तांत्रिक जज सागर साखरे व निहाल बिरनवार यांनी तांत्रिक जबाबदारी सांभाळली.
बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मा. दिलीप पवार, प्राचार्य, गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डॉ. अरुणकुमार लोहार, डीवायएसपी, सीआयडी, कविता भोंगडे, प्राचार्य, जेसीस कॉन्व्हेंट विलास फटे, अध्यक्ष, योग विद्याधाम केंद्र विनोद भोंगडे, माजी प्राचार्य, नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालय, शहापूर डॉ. रमेश खोब्रागडे, अध्यक्ष धनंजय बिरनवार, सचिव मनोज पुडके, यशवंत बीरे, सदस्य निशांत नेवारे, सहसचिव, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन भंडारा यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील विजेत्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा मान्रवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. निवड चाचणीच्या माध्यमातून पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली.
ही जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जेसीस कॉन्व्हेंट, भंडारा येथील क्रीडाशिक्षक राहुल पाठक, सीमा गोंडाळे, तसेच शाळेतील कर्मचारीवर्गाचे व लीना वालदे, कृष्णा वगाडे, वंदना मदनकर, प्रीतमा कुमरे, डिंपल हंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. योगासनाच्या माध्यमातून विद्यार्थीमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धास स्पर्धाक, पालक, योगप्रेमी व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








