भंडारा येथे काकड आरती व कार्तिक मासानिमित्त हरिनामाचा गजर

विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- शहरातील शुक्रवारी पेठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील श्री हनुमान मंदिर देवस्थानत दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक मास व काकड आरतीनिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शरद पौर्णिमेच्या पावन पर्वावर रात्री १० ते १२.३० वाजेपर्यंत कोजागिरी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानंतर सोमवार, दि. २६ ऑक्टोबर ते सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ६.३० वाजेपर्यंत काकड आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत संगीतमय सुंदरकांडाचा कार्यक्रम, तर कार्तिकी एकादशीनिमित्त रात्री ८.३० ते १० वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ६ वाजता वैकुंठ पूजा, सायंकाुली ५ वाजता हनुमान मूर्तीचे अभिषेक व कलशस्थापना, सायंकाोळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत हरिपाठ व महाआरती, रात्री ९.३० वाजता तुळशीविवाह, रात्री १० ते १२.३० त्रिपुर पौर्णिमेचा कार्यक्रम तसेच रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण भजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक मास व काकड आरती सांगता समारंभानिमित्त ह.भ.प. श्री चुडामण हटवार (गुरुजी) महाराज, रा. प्रगती कॉलनी, भंडारा यांच्या अमृतवाणीतून दुपारी १२ ते २.३० वाजेपर्यंत गोपालकाल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच गोपालकाळा व प्रसादचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, हरिनामाच्या गजरात भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेता येणार आहे. तरी समस्त भाविक ভক্তांनी वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येनें उपस्थित राहून दर्शन, भजन-कीर्तन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम फुकेटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *