भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून अवैध हातभट्टीवर कारवाई
१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन जणांवविरुद्ध गुन्हा दाखल
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत अवैध हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धाड टाकून १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई मौजा मुजबी शेतशिवारातील नाल्याच्या काठावर करण्यात आली. यातील आरोपी १) जयपाल बाळकदास बागडे, वय अंदाजे ५० वर्षे, रा. अशोकनगर (फुलमोगरा), ता. व जि. भंडारा आणि २) शिरीष वालदेकर, वय अंदाजे ३८ वर्षे, रा. परसोडी, ता. जि. भंडारा हे तिथे मिळून आले.
पोलीस हवालदार राऊत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी सदर ठिकाणी रेड केली असता, आरोपींच्या ताब्यातून ३८ प्लास्टिक पिशव्यांमध्ये प्रत्येकी २५ किलो प्रमाणे ९५० किलो मोहफूल, ज्याची किंमत १ लाख ९० हजार रुपये आणि तीन लोखंडी ड्रम प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे एकूण ३ हजार रुपये किमतीचे, असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी पो. स्टे. भंडारा येथे अप.क्र. २३०१/२०२६ कलम ६५ (फ), ८१ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनात पोहवा राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भंडारा आणि सफौ मंगल कुथे, पो. स्टे. भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन भंडाराचे अधिकारी करीत आहेत.








