शंकरपूर येथे वादळी वाऱ्याने शेतातील सोलर पॅनल उडाले
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या शंकरपूर/वडेगाव येथे बुधवार, २९ जुलै रोजी, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शेतशिवाराच्या परिसरातून अचानक सोसाट्याच्या वादळी वारा वाहत आले. प्रवाहाचा वेग इतका सुसाट होता की, शेतशिवारातील सुमारे १० विजेचे खांब कोसळून असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत तर स्थानीय शेतकरी अनिल पात्तिकर यांच्या शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व नुकतीच झालेल्या भात रोवणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चक्रीवादळांमुळे परिसरातील सर्वचं शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र; चक्रीवादळाचा प्रवाह येथील स्थानीय शेतकरी अनिल पात्तिकर यांच्या शेतशिवारातून थेट वाहून गेल्याने त्यांच्या शेतात बसविलेले सोलर पॅनल बसविलेल्या जागेवरून उखडून दूर जाऊन पडले तर बोरवेल्स पंप जागीच वाकले. नुकतीच झालेल्या भात रोवणीमध्ये झाडे उन्मळून पडल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
“सतत धार पावसाने व जोराचा वारा आल्यामुळे माझ्या शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व भात रोवणीचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करतो आहे.”
“यापूर्वीही गावात बरेंच चक्रीवादळ आले, मात्र; असा चक्रीवादळ हा गावात पहिल्यांदाचं आला आहे, या वादळांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसलेल्या आहे.”
“चक्रीवादळाच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने विद्यार्थ्यांना सकाळ पाळीत शाळा व शेतकऱ्यांचे शेतीतील कामे बंद होते. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, यासाठी प्रथम देवाचे आभार मानतो.”
–अनिल पात्तिकर, रेखराम मडावी, रमेश सोनवाने
शेतकरी, शंकरपूर
शंकरपूर/वडेगाव या मुख्य मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने मानवी रहदारी ठप्प पडली होती. तर शेतशिवारात विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजसेवा पुरवठा खंडित झाला आहे. या सेवा पूर्णवतः सुरू करण्यासाठी तारमार्ग तंत्री व संबंधित शेतकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत तर येत्या ७२ तासांत शेतशिवारातील झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.








