आ. रोहित पवार यांनी घेतले चांदपूर येथे हनुमंताचे दर्शन
आ. रोहित पवारांचे सिहोरा येथे जंगी स्वागत
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- आज आमदार रोहित पवारांचे सिहोरा येथे जंगी स्वागत करण्यात आले. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले रोहित दादा पवार तुमसर वरून गोबरवाही ते सीतासावगी मार्गे चांदपूर देवस्थानला भेट देत हनुमंताचे दर्शन घेतले. रोहित पवार यांचे हनुमान देवस्थान कमेटी तर्फे सुद्धा शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळेस देवस्थान कमेटीचे खुमन चौधरी, गंगाधर तुरकर व कमेटीचे सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी तुमसर, गोबरवाही, चांदपूर मार्गावर ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले.
चांदपूर देवस्थान येथे हनुमंताचे दर्शन घेऊन परतीच्या वेळी टेमनी, मोहाडी खापा, गोंदे खारी येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नंतर चुलहाड बस स्थानकावर बपेरा, देवसरा व बिनाखी येथील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. सिंदपुरी व सिहोरा येथे आगमन झाल्यावर ढोल, ताशा, संदलच्या गजрат व फटाकाच्या आतिष बाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी काही शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन सुद्धा दिले.
हरदोली (सि) येथे प्रदेश महासचिव तथा पंचायत समिती तुमसरचे माजी उप सभापती हिरालाल नागपुरे यांचे हस्ते सुद्धा कार्यकर्त्यांसह स्वागत करण्यात आले. लगटच असलेल्या मोहगाव खदान व परिसरातील कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झाले होते. आम. रोहित पवार यांचे सोबत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आम. चरण भाऊ वाघमारे, छोटू तुरकर हे सोबत होते. सिहोरा येथे स्वागत करण्यात आले त्यावेळी गोपाल येळे, धरम बिउने, योगराज टेंभरे, रवींद्र तुरकर, विकास बिउने, सुशील कुंभारे, रामेश्वर मोटघरे व कार्यकर्ते मोठचा संख्येने उपस्थित होते. रोहित पवार यांच्या दौऱ्या दरम्यान महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी सोबत होते.








