भंडाऱ्यात ११४ शिक्षकांचा गौरव सोहळा

विमानी, गोविंदराव फाउंडेशन व गोविंद मैना फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

दै. लोकजन वृत्तसेवा
सिद्ली/आंबडी :- समाज घडवण्याचे पवित्र कार्य अविरतपणे करणाऱ्या गुरुजनांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दि. १३ सप्टेंबर रोजी हेमंत सेलिब्रेशन भंडारा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन आणि गोविंद मैना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले होते.

उद्घाटक आमदार ॲड. अभिजीत वंजारी, प्रमुख अतिथी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, गोविंद मैना फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा अडबाले, माजी अध्यक्ष होमराज कापगते, संस्थापक अध्यक्ष राजाराम शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भंडारा ३१, गोंदिया २५ व नागपूर ग्रामीण ३३, नागपूर शहर २९ या जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अशा एकूण ११४ उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक इत्यादी मोठ्या संखेने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रास्ताविक सुधाकर देशमुख यांनी केले. परिचय राजेश धुर्वे, अविनाश बडे यांनी केले. संचालन सुप्रिया टेंभूर्णे व शमशाद सय्यद यांनी केले तर आभार पुरुषोत्तम लांजेवार यांनी मानले.

जिल्ह्यातील यांचा झाला सन्मान
होमराज कापगते, राजाराम शुक्ला, यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम, प्राचार्य श्यामसुंदर चरडे, प्रा. नलिनी गिरीपुंजे, मुख्या. घनश्याम मरकाम, श्रुती ओहळे, निलीमा धावडे, रजनी बोन्द्रे, प्रकाश उघाडे, अर्जुन ठवकर, ज्ञानेश्वर सहारे, टेकचंद मारबते, अनंत जायभाये, भूमिका बिलबने यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *