मोहाडी पोलिसांचा रूट मार्च
दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षेतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी आज मोहाडी शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तातील जवानांनी शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले.
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढवून कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.








