विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंडेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
दै. लोकंजन वृत्तसेवा
मुंबई:- गेल्या दोन महिन्यांंपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणार्या मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कॅन्टीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असावा, यासाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही मोहीम लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील १ लाखांहून अधिक शाळांमध्ये २ कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचा आहार मिळणे हा त्यांचा हक्क आहे.








