जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ घरांचे नुकसान
सालेबर्डी येथे १ घर कोसळले
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मौजा सालेबर्डी येथे १ घर पडून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा यांनी आज सकाळी ११.१९ वाजेपर्यंतचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे.
जिल्ह्यात साकोली, मोहाडी आणि तुमसर तालुक्यात घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार १७ घरांचे नुकसान झाले आहे. यात अंशतः १२ घरे, पूर्णतः ०५ घरे व तीन गोठ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत निरंकमौजा सालेबर्डी येथील घर पडल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान होऊन सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महसूल विभागाकडून पंचनामा सुरू असल्याची माहिती आहे.
गोसे खुर्द – ७६.८८% ਭरले असून ०७ गेट ०.५० मी. ने उघडण्यात असून ९५९.१८ क्युमेक विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मोहाडी आणि तुमसर तालुक्यात सर्वाधिक पाऊस
भंडारा :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाची नोंद महसूल विभागाने जाहीर केली आहे. आज सकाळी ११.२२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९३.९ मिमी पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीच्या ४७.३ टक्के आहे.
तालुकानिहाय एकूण पाऊस (१३ सप्टेंबर पर्यंत) भंडारा तालुका : ९२.८ मिमी (५०.१%), मोहाडी तालुका : १०८.० मिमी (६१.७%), तुमसर तालुका : ११६.९ मिमी (५९.७%), पवनी तालुका : ८४.० मिमी (४४.४%), साकोली तालुका : ९७.७ मिमी (४३.८%), लाखंदूर तालुका : ५२.६ मिमी (३४.७%), लाखनी तालुका : ९९.४ मिमी (५०.८%).
आजच्या घडीला सर्वाधिक पाऊस मोहाडी तालुक्यातील पालोरा सर्कलमध्ये २२९.२ मिमी (१३१%) इतका झाला आहे. त्याखालोखाल वरठी सर्कलमध्ये ११५.२ मिमी आणि धारगाव सर्कलमध्ये १२५.० मिमी पावसाची नोंद आहे. भंडारा तालुक्यातील शाहपूर येथे १०६.३ मिमी, तर तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे ११३.१ मिमी पाऊस झाला आहे. आज दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यातील धारगाव सर्कल (४६.५ मिमी), आडळूळ सर्कल (४४.० मिमी) आणि लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सर्कल (४३.५ मिमी) येथे झाला आहे.








