नातवाच्या निधनानंतर आजोबानेही सोडले प्राण पालोरा गावात हळहळ; अंतयात्रेला शेकडोची उपस्थिती
दै. लोकंजन वृत्तसेवा
करडी/ पालोरा :- रक्ताच्या नात्याची वीण किती घट्ट असते, याचा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे बुधवारी (२९) घडला. नातवाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर काही वेळातच आजोबांनाही हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचाही मृत्यू झाला. नितीन रमेश मते (४०) व रामचंद्र महादेव मते (७१) अशी मृत नातू व आजोबाचे नाव आहे. घरातून एकाच वेळी नातू आणि आजोबांची अंतयात्रा निघताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.
पालोरा येथील नितीन मते यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. या घटनेने मते कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. नातवाच्या निधानाची बातमी कळताच त्यांचे आजोबा रामचंद्र महादेव मते यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचीही प्राणज्योत मालवली. या दुहेरी दु:खांमुळे हळहळ व्यक्त करण्यात आले. नातवावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आजोबांना हा आघात सहन झाला नसल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
एकाचवेळी अंतसंस्कार
सायंकाळी पालोरा येथील स्मशानभूमीत आजोबा आणि नातावर एकाच वेळी अंतसंस्कार करण्यात आले. दृश्य पाहून उपस्थांच्या डोळ्यात अश्रूतरळले. गावातील अनेकांनी या प्रसंगाल मते कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वांत वेदनादायी क्षण असल्याची भावना व्यक्त केली.
हजारांची उपस्थिती
या अंतसंस्काराला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य के. बी. चौरांगडे, बाबू ठवकर यांच्यासह परिसरातील मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून मते कुटुंबियांना धीर दिला.








