दोन बिबट पिल्लांना आईने नेले परत

लाखनी वनपरिक्षेत्रातील सोनमाळा येथील घटना

दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सोनमाळा येथे दोन बिबट्याची बछडे आढळून आले होते. त्या वनक्षेत्रात एक ते धीड महिन्याचे बछडे सोडून बिबट मादी इतरत्र निघून गेली होती.

वन विभागाने बछड्यांच्या सुरक्षतेचा विचार करून तातडीने उपाय योजना राबविण्यात आली होती. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यावर कॅमेरे लावून करडी नजर ठेवण्यात आली. दि. २१ रोजी रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान मादी बिबटणे आपल्या बछड्यांचा शोध घेऊन दोन्ही बछड्यांना पिवळ्या गेटमधुन काढून घेऊन गेली.

बछड्यांना त्रास होऊ नये व त्यांच्या आईची भेट व्हावी यासाठी विशेष दक्षता बाळगण्यात आली होती. वन विभागाने नैसर्गिक अधिवासात कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये म्हणून सोनमाळा, मिरेगाव व लागतच्या गावांना सूचना देण्यात आल्या होत्या रात्री ८ वाजता मादी बिबट्याने पिल्लांना नेल्यानंतर शीघ्र बचाव दल व वनकर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

या कार्यवाहीला जिल्हा वनसंरक्षक योगेंद्र सिंग, सहा. वनसंरक्षक संजय मेंढे, वनपरिक्षेत्राधिकारी निलेश धनविजय, सहा. वनक्षेत्राधिकारी लक्ष्मीकांत बोरकर, बीटरक्षक गायत्री मेश्राम, राहुल बोरकर, जीवशास्त्रज्ञ शुभम मोदरकर, शिशु बचाव दलाचे मयूर गायधनी व इतर सदस्यांनी सहभाग घेऊन बिबट मादी व दोन बछड्यांचे पुर्नमिलन घडवून आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *