हिट अँड रनमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

अज्ञात स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- नॅशनल हायवे क्र. ५३ वर बेला येथे डिलक्स टायर दुकानसमोर झालेल्या हिट अँड रन अपघातात एका ६२ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी शुभम आनंद बावणे (वय ३१, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा) हे आपल्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेड क्र. एमएच ३६ व्ही ५१९५ ने मृतक उल्हास घाडू कोलाटकर (वय ६२) यांच्यासह हिवरा येथे दसरा पाहून परत येत होते. बेला येथे नॅशनल हायवेवर पांढऱ्या रंगाच्या अज्ञात स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाने भरधाव व हलगर्जीने वाहन चालवून त्यांच्या मोपेडला धडक दिली.

या धडकेत उल्हास कोलाटकर यांचा मृत्यू झाला. तर शुभम बावणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालकाने पोलिसांना माहिती न देता व वैद्यकीय मदत न देता घटनास्थाळावरून पळ काढला. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस ठाणे भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि नवखरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *