घरातील विद्युत जोडणीचे काम ठरले जीवघेणे; करंट लागून मृत्यू
लाखांदूर : घरातील विद्युत जोडणीचे काम करत असताना लोखंडी स्टँडला विद्युत प्रवाह उतरल्याने लागलेल्या जोरदार विजेच्या धक्क्यात नितेश श्रीराम तुपटे (४०), रा. शारदा चौक, लाखांदूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना लाखांदूर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तुपटे हे आपल्या भावासोबत विद्युत जोडणीची कामे करीत होते. एका बांधकामाधीन घरात पंख्याच्या वायरिंगचे काम सुरू असताना तेथे उभ्या असलेल्या लोखंडी स्टँडला अचानक विद्युत प्रवाह उतरला. त्याच्या संपर्कात आल्याने नितेश यांना जोरदार विद्युत धक्का बसला आणि ते खाली कोसळले. त्याचवेळी घरमालक शेजारील खोलीत असताना आवाज झाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत पडलेल्या नितेश यांना तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासांती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे शारदा चौक परिसраसह लाखांदூரில் हळहळ व्यक्त होत आहे. लाखांदूरचे पोलीस निरीक्षक गिरीश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.








