तुमचे पैसे रस्त्यावर पडले सांगत ज्येष्ठाची ११ लाखांची फसवणूक
भंडारा पोलीस स्टेशन जवळील घटना
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- ‘काका, तुमचे पैसे रस्त्यावर पडले’ असे सांगून दुचाकीच्या डिकीत ठेवलेले १२ लाख रुपये लंपस केल्याची धक्कादायक घटना भरदिवसा भंडारा शहरात घडली आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक जनार्धन बनसोड (वय ६०, रा. लाला लजपतराय, भंडारा, सेवानिवृत्त) यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजтаच्या सुमारास भारतीय स्टेट बँक, केशव भवन, भंडारा येथून १३ लाख रुपये काढले होते. त्यापैकी १२ लाख रुपये पांढऱ्या रुमालात बांधून व १ लाख रुपये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ते अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, भंडारा येथे फिक्स डिपॉजीट ठेवण्यासाठी दुचाकीच्या डिकीत ठेवून स्टेट बँकेहून निघाले होते.
अर्बन बँकेकडे जात असताना अंदाजे २६ ते २७ वयोगटातील दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व ‘काका, तुमचे पैसे रस्त्यावर पडले’ असे म्हणाले. फिर्यादीने मागे वळून पाहिले असता रस्त्यावर शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा पडलेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी दुचाकी अर्बन बँकेच्या एटीएमसमोर रस्त्याच्या बाजूला ठेवली व रस्त्यावर पडलेल्या पैшаंकде गेले. त्यावेळेस रस्त्यावर पडलेले पैसे दुसरे लोक उचलत होते.
दोन ते तीन मिनिटांत ते पुन्हा गाडीकडे आले व डिकीतील पैसे काढण्यासाठी गेले असता डिकीत ठेवलेल्या १३ लाखांपैकी रुमालात बांधलेले १२ लाख रुपयांचे बंडल दिसून आले नाही. डिकीत फक्त १ लाख रुपयांचे बंडल होते. त्यांनी तातडीने १ लाख रुपये मित्र प्रकाश पंधरे यांच्याकडे बँकेत भरण्यासाठी दिले व १२ लाखांचा इकडे-तिकडे शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाही.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने लक्ष विचचलित करून पैसे चोरून नेल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. याप्रकरणी पो.स्टे. भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि वरखेडे करीत आहेत.








