राहुल गांधींच्या अटकेचा व लाठीचार्जचा काँग्रेसच्यावतीने निषेध मोर्चा

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या माजी मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज भंडारा येथे विद्यार्थ्यांमधील अमानुष लाठीचार्ज, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेश यादव यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तसेच नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणीसाठी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

विश्रामगृह, भंडारा येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मा. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी, राहुल गांधी व अखिलेश यादव यांच्यावरील कारवाईचा निषेध, नीट व इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात मा. यशोमती ठाकूर (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मुकुंद साखरकर (अध्यक्ष, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी), धनराज साठवणे, विकास राऊत, प्यारेलाल वाघमारे, जयश्री बोरकर, स्वाती वाघाये, पूजा हजारे, पूजा बाबरे, रिजवान काझी, नाहिद खान, इम्रान पटेल, जयंत बोटकुळे, मंगेश हुमणे, रिजवान शेख, वैभव मेंडे, जनार्दन निमबारते, सोनू कोटवाणी, मुलचंद ईश्वरकर, राजेश ठवकर, रविकांत कोंडासे, बाबा पाटेकर, सुरेश गॉनाडे, शीलवंत मडामे, अभिजीत वंजारी, प्रमोद मानापूरे, संजय कांबळे, नरेंद्र साकुरे, पृथ्वी तांडेकर, परमेश बलके, कमल साठवणे, किशोर राऊत, पराग सुखदेवे, सागर बावने, बालू ठवकर, रुतुजा पडोळे, माणिकराव भेंडारकर, शाहिद अली, जाहिर मालाधारी, प्रणय मेश्राम, सचिन फाले, नंदकिशोर कावडे, विजय शहाणे, हन्सराज आगाशे, गजानन बादशाह, भावेश वसंत नागपुरे, मनीषा निंबारते, शीतल राऊत, नरेश ईश्वरकर, प्रेमदास वनवे, देवेंद्र इलमे, आनंद नागose, शिवदास गायधने, कमलाकर रायपूरकर, राजेश हटवार, रोहित खोब्रागडे, भाउराव दासरे, नवाब पटेल, श्रावण लांजेवार, किशोर भोयर, मनोज बनसोड, पंकज उके, मनोज वानखेडे, धनराज सोने, महेश कोरम, संजय बांते, राकेश बिसेने, संजय देवगडे, राजू चांगडे, संदीश शामकूर, अवंती राऊत, दुर्गेश तीमाडे, एकनाथ भुरे, अनिता भुरे, शंकर तेलमासरे, जगदीश उईके, योगेश झलके, शाहिन मुन, राजू निर्वाण, योगेश गायधने तसेच भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल व सर्व फ्रंटल संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *