“जय शिवाजी -जय भारत’पदयात्रेने भंडारा शहरवासी झाले मंत्रगुग्ध
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेची सुरूवात गांधी चौकातुन झाली. याप्रसंगी राज्य गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. आज सकाळी नगरपालीकेचे सर्व नगरसेवक-नगरसेवीका, पदाधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले होते.गांधी चौकातून ढोल ताशा वादयासंह व पारंपारिक वेशभुषेतील युवक युवती सहभागी झाले होते.
यामध्ये शिवाजी राजाच्या, माता जिजाऊच्या वेशभुषेतील युवक -युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते. शालेय विदयार्थी विदयार्थीनी लेझीम पथकावर ताल धरला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील प्रसंगावर नाटिका, नृत्य सादर केले. पदयात्रेला जल्लोषात सुरुवात झाली पदयात्रेमध्ये राष्ट्रीय जीवन्नोती अभियान नगरपरिषद अंतर्गत विविध महिला बचत गटांनी ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेमध्ये वेशभूषा केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील मर्दानी खेळांचे सादरीकरण अष्टेंडू आखाडाच्या खेळाडूंनी केले. लेझीम पथक उत्साह वाढवत होते. मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. सकाळी ८ वाजता नगरपालिका, गांधी चौक येथे या पदयात्रेस प्रारंभ झाला. गांधी चौकातून शास्त्री चौक मार्गे शिवाजी वॉर्ड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला. पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले.समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिक्षक नुरूल हसन,निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले .पुतळासमितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेकडो विद्यार्थी, खेळाडू, एनसीसी, एनएसएस, विविध क्रीडा संघटनांचे सदस्य, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.









