मऱ्हेगाव येथे दिवसाढवळ्या रस्त्यावरच्या दोन घरी चोरी
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव (जुना) येथे बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी भरदिवसा दुपारी ११.३० ते १.०० वाजता दरम्यान दोन घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. मार्कंड तरोणे यांचे इथून १० ग्राम सोने व ५७०० तर जयराम ब्राह्मणकर यांच्या कडून ३००० चोरीला गेले. दोन्ही राहणार मऱ्हेगाव तालुका लाखनी असे घरमालकांचे नाव आहे.
घटनास्थळावर पोलीस ताफा तपासाकरिता हजर झाला. मऱ्हेगाव हा शेतकरीनिष्ट गाव आहे. ९०% गावकरी सकाळपासूनच शेतीत खपतात. घरात म्हातारी मंडळी किंवा बच्चे कंपनी राहतात. मात्र दुपारच्या वेळेस बच्चेकंपनी सुद्धा शाळेत जाते. त्यामुळे घर रिकामा असतो. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. दुपारी ११ ते १ वाजे दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश केला. १ डिसेंबरला वाकल येथे टीकाराम तरारे यांच्या घरी सुद्धा दुपारी याच वेळेत धाडसी चोरी झाली होती. यात सुद्धा ३० ग्राम सोने चोरीला गेले होते. हे येथे उल्लेखनीय! मऱ्हेगाव येथील चोरी झालेल दोन्ही घर अगदी रस्त्यावर आहेत. रस्ता सुद्धा वदर्ळीचा आहे. अशा ठिकाणी चोरी झाल्याने गावात भीतीयुक्त वातावरण आहे.
मंगळवारला दुपारी ११ ते १२ वाजे दरम्यान दोन दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला मोटरसायकल उभी केली. आम्ही रस्त्याचे बांधकाम पाहण्याच्या अनुषंगाने चौकशी करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या कानात बारी टोचवली होती. अशी माहिती चोरी झालेले घरमालक जयराम ब्राह्मणकर यांनी सांगितले. घटनास्थळावर स्वानपथक, फॉरेन्सिक टीम, फिंगर एक्सपर्ट व पोलीस उपनिरीक्षक विजय हेमने, पुंडलिक सिंगनजुडे इतर सहकारी उपस्थित झाले. सदर प्रकरणी पालांदूर पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार सतीश बनसोड यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर करीत आहेत.







