घरोघरी वीज बिलाची वसुली, मात्र रक्कम विद्युत कार्यालयात जमा केलीच नाही

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- घरोघरी जाऊन थकित बिलाची वसुली करण्यात आली. मात्र वसुली करण्यात आलेली रक्कम विद्युत कार्यालयात जमा करण्यात आली नाही. परिणामतः ग्राहकांना वाढीव विद्युत बिल आल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

याप्रकरणी दोषी असलेल्या करडी येथील दोन विद्युत कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सविस्तर असे की, करडी विज वितरण विभागातील विद्युत सहायक कर्मचारी दिनेश बारई व कान्हळगाव येथे कार्यरत असलेले लाईनमन महेश वरठे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून विद्युत बिलाची वसुली केली. परंतु, ती रक्कम विद्युत कार्यालयाला जमा करीत नसल्याने नागरीकांना बिलाची रक्कम वाढून आली.

बिलाची रक्कम भरली असतांना पुन्हा बिलाची रक्कम वाढून कशी आली? या बाबतीत करडी विज वितरण विभागात चौकशी केली असता हा प्रकार दिसून आला. दुसरे विद्युत सहाय्यक कर्मचारी दिनेश बारई हे जनरलमध्ये ड्युटी करीत असल्याने घरोघरी जावून नागरीकांना धमकी देवून बिलाची रक्कम जमा केली. परंतु,त्यांनी सुध्दा विज वितरण विभागाला रक्कम भरली नाही. नागरीकांनी चार पाच दिवसांपूर्वी दिनेश बारई यांना विज वितरण कार्यालयात पकडून आणले असता त्यांनी बिलाची वसुली केली असल्याचे कबुली केले.

कर्मचारी फसविगीरी धंदे करीत आहेत तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही. दिनेश बारई या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घरोघरी बिलाची वसुली केली आहे. त्यामुळे नागरीकांवर मोठ्या प्रमाणात बिल वाढून आलेले आहे. त्यामुळे ज्या नागरीकांचे बिलाची वसुली केली आहे त्यांचे बिलाची रक्कम दिनेश बारई कडून वसुल करुन बिलाची रक्कम भरण्यात यावी व दोन्ही कर्मचाऱ्यांनानिलंबित करण्याची मागणी केली आहे.

करडी सब डीव्हीजन ला अगोदरच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे विज वितरण विभागाववर तणाव वाढला असतांना सुध्दा दोन डमी कर्मचारी ची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांना एकतर निलंबित करण्यात यावा, नाहीतर बदली करण्यात यावी. पालोरा गाव मोठा असून स्थानिक लाईनमनची नियुक्ती नाही आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईट गेली तर मोठी अडचण निर्माण होतो आहे त्यामुळे पालोरा येथे स्थायिक लाईनमेची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *