राष्ट्रवादी पक्ष का कमांडर हुंःहंटर भी चलाना जनता हुं!
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- नगर परिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर असताना तुमसरचे राजकीय तापमान उसळलं आहे. शहर कार्यकर्ता मेळावा म्हणजे उत्साह, पण बुधवार ला झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा हा उत्साहापेक्षा ज्वालामुखीचा उद्रेक ठरला. कारण मंचावर उभे राहताच प्रफुल्ल पटेलांनी घेतलेल्या आक्रमक टोनने संपूर्ण सभागृहात शॉकवेव्ह टाकली. “राष्ट्रवादी पक्षाचा मी कमांडर आहेः शिस्त जर मोडली तर हंटर ही चालवतो! आणी ते कोणावर चालवायचं तेही मला चांगलं माहित आहे!’
या एका वाक्यानं कार्यकर्तामेळाव्याचा तापमानच वाढलं. पटेलांनी कोणाचंही नाव न घेता सरळ विद्रोही गटाला लक्ष करीत पक्षाचे आदेश झुगारून, स्वतःचं राज्य मांडायला निघालेल्यांना ज्या कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त मोडून वेगळा गट जमवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पटेलांनी प्रत्यक्ष हल्ला चढवला. पक्षानं पद दिलं, मान दिली, आता निवडणुकीच्या तोंडावर वेगळे सूर लावून घरातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे कार्य करू नये. अशी ताकीद दिली.









