जिल्ह्यात २२४ केंद्रांवर होणार भात खरेदी

 भंडारा ः- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट कोऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी, रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर खरीप आणि रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ साठी धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार आहे. ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल २ हजार ३८९ रुपये, तर सर्वसाधारण भाताला २ हजार ३६९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार भात खरेदीचा धान खरीप पणन हंगाम कालावधी ३ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६, तर भरडधान्य खरीप पणन हंगाम १ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा असेल, तर रब्बी पणन हंगाम केंद्रांकडून प्राप्त सूचनांनुसार राहील. भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यासह गाव नमुना ८ (अ) ची छायांकितप्रत खरेदी केंद्रावर आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी होईल. ७/१२ उता-नुायसार पिकाखालील क्षेत्र, यंदाची पीक परिस्थिती, सरासरी उत्पादन या सर्व बाबी विचारात घेऊन खरेदी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *