भेलच्या अधिग्रहीत जागेवर शेतकरी करु शकणार शेती
भंडारा :- भेल प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या जागेवर जोपर्यंत उद्योग स्थापन होत नाही तोपर्यंत शेतकरी या जागेवर शेती करु शकतात, असा आदेश भंडारा न्यायालयाने दिला आहे. परिणामी या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंद असून अन्य मागण्याही पूर्ण कराव्यात, अशी मागणी भेल प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय नवखरे यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत केली. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार राजेश काशीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, मुकेश थानथराटे आदी उपस्थित होते.
माहिती देताना नवखरे म्हणाले, २०१३ ला भेल देताना नवखरे म्हणाले, २०१३ ला भेल प्रकल्पासाठी ४७६ एकर जमीन शेतकऱ्यांकडून संपादीत करण्यात आली होती. मात्र १२ वर्ष लोटूनहीप्रकल्प सुरू झाला नाही. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचेही कबूल करण्यात आले होते. मात्र प्रकल्पच उभारला न गेल्याने हातची शेतीही आणिभविष्याचे स्वप्न भंगले. दरम्यान ९ जून रोजी शेतकऱ्यांना शेतजमीन कसण्यासाठी देण्यात यावी या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. मुंडीपार बाम्हणी पिंपळगाव गावातील शेती या प्रकल्पात गेली. आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी येथे धानाची लागवड केली. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहो. या प्रस्तावित जागेवर उद्योग उभारुन २०१४ च्या जीआर नुसार वाढीव दर देण्यात यावा अशा अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या.









