लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् ‘आप’ ने एकमेकांना शिंगावर घेतलं
नवी दिल्लीः- ६ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी एकजूट दाखवली. सर्व पक्षांनी एकत्रित निवडणूक लढत भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळवण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एकत्रित लढणाèया इंडिया आघाडीत आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुट पडल्याचं पाहायला मिळतंय आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला गांभीङ्र्मांने घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसनेही अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील स्थावर मालमत्तेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवातकेली होती. त्यावेळी काँग्रेस आणि आपमध्ये संघर्ष पेटलाय.