शशांक आठले यांचे निधन

भंडारा:- पवनी येथील वैनगंगा विद्यालयातील संगीत शिक्षक भंडारा निवासी शशांक पुरुषोत्तम आठले यांचे आज ४ जून रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. चांगले गायक म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांपासून पवनी येथील वैनगंगा विद्यालयात ते संगीताचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज ४ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मुले आणि बराच मोठा परिवार आहे. ५ जून रोजी सकाळी १०:३० वाजता वैनगंगा स्मशानभूमीत कोणत्या संस्कार केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *