मोफत पाठयपुस्तकांचे संच शाळेत पोहचते करा

दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ च्या विध्यार्थ्यांना देण्यात येणारे मोफत पाठ्यपुस्तकांचे संच शाळेत पोहचवून देण्याच्या मागणीसाठी विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थां आणि खासगी अनुदानित शाळेतील कोणताही विद्यार्थी पुस्तकाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, विद्यार्थ्यांचीशाळेत उपस्थिती १००% राहील, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होईल, सर्वांना समान संधी मिळावी. यासाठी मोफत पाठ्यपुस्तक योजनाद्वारे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या कार्यालयाद्वारे निश्चित केलेल्या वाहतूकदाराद्वारे विभागीय पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर शाळेत पोहचवून देणे अनिवार्य असून याबाबत दि. ७ एप्रिलच्या सभेत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पुस्तके शाळेत पोहचवून देण्याचे निर्देश दिलें आहेत.त्यामुळे पुस्तकासाठी शाळांना केंद्रात न बोलावता प्रत्येक्ष शाळेत पुस्तके पोहचते करण्याची विदर्भ खाजगी प्राथमिक संघाने मागणी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, जिल्हाकार्यवाह प्रभाकर मेश्राम, विमाशि जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, कार्याध्यक्ष धिरज बांते, विलास खोब्रागडे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *