
पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चां आहे. सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.