पालोरा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केद्राचा शुभारंभ
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील विविध सेवा सहकारी संस्था गोडावून मध्ये भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संस्था च्या वतीने आज दि. ४ जुन २०२५ रोजी सरपंच शिल्पा तुमसरे यांचे हस्ते आधारभुत धान खरेदी केद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संस्था संचालक विरेंद्र रंगारी, वि. से. संस्था अध्यक्ष गौरीशंकर राऊत, उपसरपंच रत्नदिप मेश्राम, माजी अध्यक्ष रामचंद्र मते, दुग्ध संस्था अध्यक्ष अमरकंठ लांडगे, कृष्णाजी कुकडे, माजी संचालक पारबता मेश्राम, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर रोटके, ग्रेडर सुरेश मोहतुरे, शंकर राऊत, कमलेश कुकडे व इतर नागरीक उपस्थित होते.
करडी पालोरा परीसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्री करण्याकरीता मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संस्था अध्यक्ष धनपाल चौधरी व संचालक विरेंद्र रंगारी यांनी आधार भुत धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरीता पुढाकार घेवून पालोरा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी केंद्रावर धान विक्री करण्याकरीता आणावे असे संस्था चालक यांनी सांगितले आहे.