समाजसुधार सहकारी पतसंस्था गुंथारा शाखेच्या नविन इमारतीचे उद्घाटन

दै. लोकजन वृत्तसेवा वाकेश्वर ः- भंडारा तालुक्यातील नावारूपाला येऊन सामान्य लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली समाजसुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वर या पतसंस्थेचे पहेला, गुंथारा व भंडारा येथे शाखा असून विद्यमान संचालक मंडळाच्या दुरदृष्टी नियोजनातून गुंथारा येथे पतसंस्थेच्या मालकीची स्वतंत्र इमारत तयार करण्यात आली. आणि समाजसुधार सहकारी पतसंस्था शाखा गुंथाराच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा कविताताई जगदिश उईके, जि. प. भंडाराचे गटनेता विनोदजी बान्ते, पतसंस्था संघ भंडाराचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण सार्वे, न. प. भंडाराचे माजी नगराध्यक्ष रामदासजी शहारे, पतसंस्था संघ भंडाराचे सचिव रामलाल बोंद्रे, प्रशांत खोब्रागडे, महेंद्र मेंढे, गुंथारा चे सरपंच रमेशजी चावरे, समाजसुधार पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषजी आजबले, समाजसुधार पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाणे, माजी जि. प. सदस्य व पतसंस्थेचे विद्यमान संचालक नीलकंठजी कायते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या नवीन वस्तूचे उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांच्या शुभकमलांनी नवीन वास्तूच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करतांनी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत माते च्या फोटोचे पूजन करण्यात आले. समाज सुधार सहकार पतसंस्थेचे महिला कर्मचारी यांनी यावेळी सहकार गीत गायले. उपस्थित मान्यवरांचा समाजसुधार सह. पतसंस्थेच्या वतीने मोमेंटो, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या गावातील सरपंच व पोलीस पाटील यांचाही या कार्यक्रमात शाल, पुष्पगुच्छ व मोमेंट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वर चे अध्यक्ष सुभाषभाऊ आजबले यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पतसंस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच नवीन योजनां विषयीची ही माहिती दिली.

यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रामदासजी शहारे, विनोदजी बान्ते, कविताताई उईके यांचेही भाषणे झालेत. त्यांनी पतसंस्थेच्या नवनवीन योजनांचे आपल्या मनोगतातून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था उपाध्यक्ष सुरज गोंडाणे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार पतसंस्था संचालक अनिल दिघोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाजसुधार सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, अभिकर्ते आदींनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *