धिरज शिवणकर याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तंत्रज्ञ म्हणून निवड
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा!ङ्क हे शब्द धिरज शिवणकर यांच्या जीवनात अगदी तंतोतंत लागू पडतात. धिरजच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे कीस्वप्नांची उंची परिस्थितीवर अवलंबून नसते; ती ठरवतात जिद्द आणि अथक मेहनत.
शेतकरी कुटुंबातील जिद्दी मुलगा: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) या छोट्याशा गावातीलधिरज प्रविंदा परसराम शिवणकर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) मध्ये तंत्रज्ञ म्हणून यशस्वी झेप घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगा असूनही, धिरजच्या आईवडिलांनी शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. शेतकरीकुटुंबातील आर्थिक आव्हाने असूनही धिरजच्या आईवडिलांनी कधीच त्याच्या शिक्षणासाठी कसर सोडली नाही. त्यांच्या मेहनतीला धिरजनेही मेहनतीची साथ दिली आणि अखेर त्याने आपल्या स्वप्नांना गगनभरारी दिली.
विदर्भाचा झेंडा इसरोमध्ये
धिरजच्या यशामुळे भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण निर्माण झाले आहे. विदर्भाच्या भूमीतून अंतराळ संशोधन संस्थेत पोहोचणाèया धिरजने विदर्भाचा झेंडा खडठज मध्ये फडकवला आहे. धिरजच्या या यशाचे कौतुक स्थानिक आणि राष्टड्ढीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
विज्ञानाची आवड आणि प्रयोगशील वृत्ती
धिरजला लहानपणापासूनच विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड आवड होती. लहान वयातच त्याने अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. इलेक्ट्रिक गॅस शेगडी, ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटायझर, आणि फ्लॉवर ड्रॉपिंग ड्रोन ही त्याची लहान वयातील काही महत्त्वाची निर्मिती होती. त्याच्या प्रयोगशीलतेचे नेहमी कौतुक करत असणारे प्रल्हादजी तरोणे यांनी त्याला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे मोठी स्वप्ने पाहण्यास प्रवृत्त केले. या प्रेरणेतूनच धिरजने शिक्षणात सातत्य ठेवले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीच हार मानली नाही. शिक्षणासाठी अनेक अडथळे येऊनही त्याने त्याचा प्रवास खंडित होऊ दिला नाही. अखेरीस त्याची निवड इस्त्रोमध्ये तंत्रज्ञ या प्रतिष्ठित पदावर झाली. पिंपळगावसारख्या छोट्या गावातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत पोहोचलेल्या धिरजचे यश इतरांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.