तलवारबाजी स्पर्धेत पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची मुलींची चॅम्पियनशिप
वेदांती कुरंजेकर व पार्थ्वी हुमणे, अशानी बागडे यांना सुवर्ण व रजत पदक
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथील विद्यार्थिनींनी तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयीला प्रथम क्रमांकासह चॅम्पियनशिप मिळवून दिली.
दि. २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तलवारबाजी स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत अनेक पदके पटकावली. कुमारी वेदांती कुरंजेकर व पार्थ्वी हुमणे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले, तर अशानी बागडे हिने रजतपदक पटकावले. तसेच यादव्री मेश्राम, चैताली भिवगडे, मृणाल बनकर व पूजा कोल्हेारे यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या विद्यार्थिनींना तलवारबाजीचे प्रशिक्षण देणारे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विशांत टॅ्मुरकर यांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थिनींना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांच्या यशात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सुनील खिलोते, शिक्षक प्रतिनिधी व माध्यमिक विभाग प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन टॅ्मुरकर सरांचे स्वागत केले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात विद्यार्थिनींचेही पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमिक विभाग प्रमुख सुनील खिलोते, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख यावलकर, आर. डी. बनसोड, पडोळे, तुमान, बागडकर, करणकोटे, लाँडासे, खे़ो तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
उपस्थित शिक्षकांनी विजयी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा दिल्या. प्रथम क्रमांक व चॅम्पियनशिप मिळविल्यामुळे सर्व विजयी विद्यार्थिनींची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेतही विद्यार्थिनींनी उत्तम कामगिरी करावी, यासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.








