‘भंडारा चा राजा’ चे थाटात विसर्जन

नवसाला पावणारा ‘भंडारा चा राजा’ चे आज थाटामाटात विसर्जन करण्यात आले. छोटा बाजारातून ही मिरवणूक गांधी चौकात येताच जल्लोष साजरा करण्यात आला. मिरवणुकीत दांडपट्टा, महिलांची मोठ्या संख्येतील उपस्थिती आकर्षणाचे केंद्र होते. डीजे मुक्त, भक्तिमय आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे भंडाराकरांना यंदा श्रद्धा आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवता आला.

मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांची परंपरा जपली गेली. बाप्पाला निरोप देण्यासाठी भंडारेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

(चित्रसेवा – फुलसुंगे फोटो स्टुडियो, भंडारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *