डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूरची ऐतिहासिक कामगिरी – २०२६

भारतीय संरक्षण दलात चार विद्यार्थ्यांची NDA आणि CDS परीक्षेतून अधिकारी पदावर निवड !

भंडारा : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्कृष्ट निकाल व दर्जेदार प्रशिक्षणासाठी नावलौकिक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूर (DSA), नागपूर-भंडारा या संस्थेने पुन्हा एकदा वर्ष २०२६ मध्ये भारतात नवीन विक्रम स्थापित करण्यात उंच भरारी घेतली आहे.

संस्थेच्या अनुभवी प्राध्यापक वर्ग व अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर पुन्हा एकदा २०२६ वर्षात चार विद्यार्थ्यांनी अंतिम गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त करून भारतीय संरक्षण दलात (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे.

यशस्वी विद्यार्थी

– पार्थ पटेल (जबलपूर) AIR 217 | Indian Army (NDA)
– स्वयम वाघ (मुंबई) AIR 292 | Indian Army (NDA)
– अंश खेडेकर (नागपूर) AIR 417 | Indian Air Force (NDA)
– रोहित इंगोले (नागपूर) AIR 17 | Indian Navy (CDS)

ALL INDIA RECORD

– SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूर संस्थेच्या मागील ५ वर्षात २१० विद्यार्थी NDA परीक्षा उत्तीर्ण.
– सप्टेंबर २०२६ च्या NDA लेखी परीक्षेत संस्थेचे एकूण ३० विद्यार्थी उत्तीर्ण.
– जुलै २०२६ महिन्यात सहा विद्यार्थ्यांची भारतीय संरक्षण दलात अधिकारी पदासाठी निवड.
– एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची SSB मुलाखत, वैद्यकीय तपासणी आणि अंतिम गुणवत्ता यादीत निवड.

भारतीय संरक्षण दलात अधिकारी पदासाठी अत्यंत कठीण असणाऱ्या NDA आणि CDS परीक्षांसाठी SGB डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूर संस्थेकडून प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याची जिद्द, प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून सातत्यपूर्ण मेहनत व अत्यंत कडक शिस्तीच्या वातावरणात विद्यार्थ्यांकडून यश संपादन करून संस्थेने विद्यार्थी व पालकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे.

संस्थेचे संस्थापक प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रशिक्षणासोबतच शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्व विकास आणि SSB मुलाखतीची विशेष तयारी करून DSA ने भारतीय संरक्षण दलासाठी अधिकारी घडविण्याची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *