कारली जंगलात ६० हजार रुपये किमतीचा मोहफुल सडवा जप्त

गोबरवाही पोलिसांची कार्रवाई
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कारलीच्या जंगलात अवैधरीत्या दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेला अंदाजे ३०० किलो मोहफूल सडवा गोबरवाही पोलिसांनी ताब्यात घेतला. या सडवा मोह फुलाची किंमत ६० हजार रुपये असून या प्रकरणात राधेश्याम टेकचंद नागपुरे वय ४० वर्षे रा. कारली यांचे विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कारली परिसरात गस्तीवर असताना कारली जंगल शिवारातील नाल्यालगत अवैधरीत्या मोहफूल सडवा साठवून ठेवल्याची कुण कुण लागताच त्या दिशेने गस्त फिरवून घटनास्थल गाठले असता घटनास्थलार मोहफूल सडवा आढळून आल्याने त्यांनी पंच बोलावून पंचासमक्ष कार्रवाई केली.

घटनास्थावर पंचासमक्ष केलेल्या कार्रवाई त जंगलातील वाहत्या नाल्या जवळ २ खड्ड्यांमध्ये ६ प्लास्टिक चुंगळ्या मिळाल्या यात प्रत्येकी ५० किलो या प्रमाणे एकूण ३०० किलो मोहफूल सडवा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या सडवा मोह फुलाची एकूण ६० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई भरत धुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून व ठाणेदार अभिजीत पाटील यांचे आदेशाने गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये अ.क्र. ४५२/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार सुमीत राहांगडाले करीत आहेत. नुकतेच रूजू झालेले गोबरवाही पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्याच्या चर्चा सर्व दूरपर्यंत जोर धरून आहेत. हे येथे उल्लेखित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *