भंडारात मानव-वन्यजीव संघर्ष विकोपास; वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार

भंडारा तालुक्यातील गराडा जंगलातील घटना

कामावरून परतताना वाघाचा हल्ला

मानेगाव (बाजार):- जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष দিবसेंदिवस विकोपास चालल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्देवी घटना २६ ऑक्टोबर रोजी भंडारा तालुक्यातील मानेगाव ६ वाजताच्या सुमारास घडली. महेला गराडा मार्ग स्वगावी जात असलेला एका २८ वर्षीय बांधकाम ठेकेदारावर वाघाने अचानक जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बासोरा येथील मृतक अमित भीमराव राऊत (२८) हा एक बांधकाम ठेकेदार म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे तो आपले काम आटोपून पहाडी मार्गे गावाकडे परत जात असताना, गराडा जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्याच्या वेळी त्याच्यासोबत इतर चार-पाच जन देखिल होते. अचानक समोर वाघ आल्यामुळे सर्वांचीच भंबेरी आली आणि जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने पळ काढला.

परंतु, अमित राऊत हा वाघाच्या तावडीत सापडला आणि वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मुड्डा पडला. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ, नागरिक व कुटुμβियांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची गंभीर दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे हे आपल्या ताफ्यासह, तसेच कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्र्यंबक गायधने, मार्कंड डोरे, संदिप केंद्र व इतर पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळ दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, भंडारा येथे पाठवून दिला आहे.

अमित राऊत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा सुखी परिवार असून, त्याच्या या अचानक आणि अवेळी जाण्याने संपूर्ण बासोरा गावात शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात सातत्याने वाघाचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन वन विभाग व पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *