जैन कलार समाजाच्या कोजागिरी उत्सवात स्त्रीशक्तीचा गौरव!

✳ समाजातील सर्व महिलांचा मंचावर सन्मान ✳ ऑर्केस्ट्रा, लावणी आणि स्नेहभोजनाने रंगत वाढवली

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडविणारा जैन कलार समाजाचा कोजागिरी उत्सव लाखनी येथे उत्साहात संपन्न झाला. मध्यवर्ती मंडळ नागपूर संचालित येथील जैन कलार समाज भवनात आयोजित या उत्सवाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, समाजातील सर्व महिलांना एकाच व्यासपीठावर स्थान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि त्यांना सन्मानाने व्यक्त होण्यासाठी मिळवून दिलेले व्यासपीठ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोनाली भांडारकर होत्या. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अनमोल असते, कुटुंबाच्या उभारणीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या योगदानाची दखल घेत समाजातील सर्व महिलांना मंचावर विराजमान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महिलांना सन्मानाचे स्थान देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. केवळ महिलांचा गौरव करण्यापुरताच नव्हे, तर समाजजीवनात त्यांचे स्थान अधिक अधोरेखित करण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमच्या निमित्ताने समाजाच्या सामाजिक कार्यासाठी हातभार लावणारा दानशूर व्यक्तींचाही यथोचित सत्कार करण्यात आला. समाजातहितासाठी पुढाकार घेणाऱ्या या व्यक्तींच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन खरेदी केलेल्या शीतपेटीचे लोकार्पण करण्यात आले. सामाजिक कार्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रम माचे उपस्थितांनी स्वागत केले.

उत्सवाच्या सांस्कृतिक पर्यात आयोजित ऑर्केस्ट्रा आणि लावणीच्या कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. बहारदार सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीताच्या तालावर आणि लावणीच्या ठेक्यावर उपस्थितांनी मनोरंजनाचा मनमुराद आनंद लुटला. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर उत्साhane भारावून गेला.

कोजागिरीच्या निमित्ताने आयोजित स्नेहभोजनाचा समाजबांधवांनी भरभरून आस्वांद घेतला. एकत्रित भोजनातून आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले, तर संवाद आणि सहवासातून सामाजिक एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली.

महिलांचा सन्मान, दानशूरांच्या योगदानाचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, अशा विविध पैलूंनी सजलेला हा कोजागिरी उत्सव समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरला. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणिवांची जोड देत महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजाच्या सकारात्मक वाटचालीची जाणीव करून देणारा ठरला.

कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी आयोजक चंदन रणदिवे, कृष्णा खेडकर, रूपचंद भांडारकर, रवींद्र शेंडे, मधु खेडकर, हरिहर ठवरे, रमेश पालांदुरकर, शिल्पा रणदिवे, भुमिता तिडके, छाया भडाडे, राणी लिचडे आदींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *