अभिजित वंजारींच्या विजयानंतर गांधी चौकात काँग्रेसचा जल्लोष
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल गांधी चौक, भंडारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
निकाल जाहीर होताच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी चौकात जमले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा आनंद साजरा केला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पदवीधर मतदारांनी शिक्षण, रोजगार व लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी कौल दिला आहे. भाजपच्या साम, दाम, दंड, भेद नीतीला मतदारांनी नाकारले असून वंजारी यांच्या सलग दुसऱ्या विजयाने महाविकास आघाडीची ताकत सिद्ध झाली आहे. उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झालेल्या या जल्लोषात महिला आघाडी, युवक काँग्रेस व सेवाদलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.








