करडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; आठ जण ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा

करडी :- पोलीस स्टेशन करडी हद्दीतील मौजा पांजरा येथे ग्रामपंचायत समोरील सार्वजनिक रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांनी धाड टाकून आठ जुगाऱ्याना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व वाहनासह एकूण १ लाख ५९ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन करडी अंतर्गत फिर्यादी पो.शि. काळसर्पे यांनी गुप्त माहितीवरून ही कारवाई केली. यामध्ये आरोपी (१) संदिप प्रल्हाद बडगे, वय ३५ वर्षे, (२) नितेश्वर गणेश नितीरमारे, वय ३६ वर्षे, (३) राजेंद्र केशव शेंडे, वय ४० वर्षे, (४) प्रविण कृष्णा मेश्राम, वय ३८ वर्षे, (५) सुरेश शिवगिर गोस्वामी, वय ४२ वर्षे, (६) कामदेव दागो रेहपाडे, वय ५५ वर्षे, (७) किशोर अजाबाराव शेंडे, वय ३५ वर्षे, (८) राकेश अंताराम काळे, वय ३३ वर्षे, सर्व रा. पांजरा, ता. मोहाडी, जि. भंडारा हे मौजा पांजरा येथील ग्रामपंचायत समोरील सार्वजनिक रोडवर जुगार खेळताना मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थलॉवरून ५२ तासपते किंमत ३० रुपये, डाावावरील नगदी १२०0 रुपये, आरोपींच्या अंगझडतीत सापडलेले ५ हजार ५० रुपये, सहा मोबाईल व एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची एक्टीवा मोपेड गाडी क्र. एम. एच. ३६ ए.पी. ८४९० किंमती ९० हजार रुपये असा एकूण १ लाख ५९ हजार ३० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन करडी येथे अपराध क्रमांक २५०/२०२६ कलम १२ (अ) महा. जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स.पो.नि. नागलोत यांच्या मार्गदर्शनत पो.शि. काळसर्पे यांनी के ली असून सदर गुन्ह्याचा तपास समीर मेश्राम, अरविंद कावळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *